बानू असावी
एक तरी बानू असावी , मनाच्या कोपऱ्यात जावून बसावी ॥ धृ ॥
ना बंध नात्यांचे ,
ना ओझे अपेक्षांचे ,
बेधुंद रंग जीवनाचे, मन मोहिनी असावी ॥ १ ॥
सदा हास्य वदन अन ,
डोळ्यांत भीती आदराची ,
भेटीत आस मिलनाची , फक्त प्रेरणा असावी || २ ॥
मन मोकळे तरीपन ,
आधार वेल व्हावी ,
बहरेल वृक्ष संगतीने ,ती संजीवनी प्रभावी ॥ ३ ॥
वाणीत माधुर्य जपते ,
वेदना भस्म होती ,
हळुवार पाकळी सुगंधि , फुंकर ती असावी ॥ ४ ॥
सुख धर्म धेय्य अंगी ,
स्वछंद ती स्वभावी ,
सर्वस्व समर्पित असुनी , केवळ भक्त ती असावी ॥ ५ ॥
...... सुमतिनंदन
No comments:
Post a Comment