माधव मन
माधव मन भावन, झाले तन पावन ,
मुकुन्द मुरारी , कशी वाजविली बासुरी ॥ धृ ॥
सप्त द्धार तन बासुरी ,
जीवन रस वाहे अंतरी,
नाद ब्रह्म चिरकाल निनादे तव, मुख कमला वरी ॥ १ ॥ अशी वाजवली बासुरी ……
सप्त स्वर अधर धरी ,
अंगुली फिरउनी पाहे हरी,
पर ब्रह्म सनातन निघते धून , धुंद जगाला करी ॥ २ ॥ अशी वाजवली बासुरी ……
सप्त रिपु नडली भारी ,
अंतरात्मा आक्रोश करी,
कृष्ण रंग मोहरीत निघते तन, मोक्ष पाहे अंतरी ।।३।। अशी वाजवली बासुरी ……
मधूर स्वर मोहन बासुरी ,
चैतन्य प्रभू फुंकर मारी ,
जीवन मुक्तीचा अनुभव आता, रास क्रीडा करी ।।४।।अशी वाजवली बासुरी ……
……………………………… ……………………… सुमतिनंदन